Author name: Smt. Urmila Kadam

News

कमला कॉलेजमध्ये 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

दिनांक 21 जून जागतिक योग दिनानिमित्त कमला कॉलेजमध्ये योग प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले यामध्ये महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, ऑफिस स्टाफ, कर्मचारी, विद्यार्थिनी प्रात्यक्षिकासाठी उपस्थित होत्या. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कमला कॉलेजच्या योगा सायन्स विभागामार्फत पोस्टर प्रेझेंटेशन चे आयोजन करण्यात आले. सदर प्रदर्शनाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कमला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर उपस्थित होत्या

News

वरिष्ठ विभाग प्रथम वर्ष (2022-23) (B.A., B.Com., B.C.A.,B.Voc.I) प्रवेश सुरु

महाविद्यालयाची वैशिष्ट्ये. ????विद्यापीठ परीक्षा निकालाची उज्ज्वल परंपरा ????प्रात्यक्षिकांवर विशेष भर. ????तज्ञ व अनुभवी प्राध्यापक वर्ग. ????सुसज्ज ग्रंथालय ????सुसज्ज कॉम्प्युटर लॅब ????एन सी सी / एन एस एस ????ई लर्निंग ????गरजू व होतकरू विद्यार्थिनींना बुक बँक ????सुसज्ज जिमखाना ????COC courses ची सुविधा ????गरजू होतकरू व हुशार विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती तसेच आर्थिक मदत ????विद्यार्थिनींना मोफत एस टी पास योजना

News

दिनांक 17/ 2/ 2022 रोजी अध्यापक विद्यालय विद्यार्थिनींची क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालयास क्षेत्रभेट

ताराराणी विद्यापीठाच्या अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालयास क्षेत्रभेट केली याप्रसंगी ग्रंथपाल उर्मिला कदम यांनी विद्यार्थिनींना ग्रंथालयाविषयी व राबविण्यात येणार्‍या विविध उपक्रमांविषयी माहिती करून दिली. यावेळी अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापक श्री अवतार सर व श्री जगताप सर उपस्थित होते कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे या प्रसंगी मार्गदर्शन मिळाले.

Scroll to Top