News

News

Mayuri Savalkar ( B.C.A.I) has been selected for west zone inter university competition

डॉ.घाळी कॉलेज,गडहिंग्लज येथे पार पडलेल्या आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये BCA I मधील कु.मयुरी सावळकर हिने घवघवीत यश मिळवले Auro University, Gujrat येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटीच्या स्पर्धेसाठी शिवाजी विद्यापीठाच्या बुद्धिबळ संघामध्ये निवड झाली.

News

आसमा कुरणेला 21 किमी हाफ मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक

कराड येथील संपन्न झालेल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत आंतरविभागीय मैदानी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजमधील आसमा कुरणे हिने 21 किमी हाफ मॅरेथॉनमध्ये तृतीय क्रमांक मिळविला त्याबद्दल तिचे कॉलेजच्या वतीने हार्दिक अभिनंदन.

News

कमला नियतकालिक 2021 च्या अंकाचे प्रकाशन

कमला नियतकालिक 2021च्या अंकाचे प्रकाशन आज दिनांक 16.12.21 रोजी मा. डॉ. क्रांतीकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष, ताराराणी विद्यापीठ यांच्या हस्ते झाले. यावेळी प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, मुख्य संपादक प्रा. रेखा पंडित, विभागीय संपादक प्रा. सुमती साळुंखे, प्रा. डॉ. सुजय पाटील प्रा. डॉ. छाया माळी उपस्थित होते.

News

शिवाजी विद्यापीठांतर्गत इंटरझोनल स्पर्धेसाठी कमला कॉलेज संघाचा समावेश

पेठ वडगांव येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत कॉलेजचा कबड्डीचा संघ चतुर्थ क्रमांक मिळवून कराड येथे होणा-या शिवाजी विद्यापीठांतर्गत होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी पात्र.

News

शिवाजी विद्यापीठांतर्गत इंटरनल स्पर्धेसाठी कमला कॉलेज संघाचा समावेश

पेठ वडगांव येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय महिला कबड्डी स्पर्धेत कॉलेजचा कबड्डीचा संघ चतुर्थ क्रमांक मिळवून कराड येथे होणा-या शिवाजी विद्यापीठांतर्गत होणाऱ्या इंटरझोनल स्पर्धेसाठी पात्र.

News

भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉ जी. एस. घुर्ये यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजशास्त्र विभागाच्यावतीने ‘ डॉ. जी. एस. घुर्ये यांचा जीवन परिचय आणि कार्य’ या विषयावरील भित्तिपत्रकाचे आयोजन

दि.१३/१२/२०२१ रोजी भारतीय समाजशास्त्राचे जनक डॉ जी. एस. घुर्ये यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजशास्त्र विभागाच्यावतीने ‘ डॉ. जी. एस. घुर्ये यांचा जीवन परिचय आणि कार्य’ या विषयावरील भित्तिपत्रकाचे प्रदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे उदघाटन मा.प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रा. साळुंखे मॅडम ,समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक उपस्थित होते. तसेच बीए ।, ।।, lll च्या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.

News

हिंदी विभाग व ग्रंथालयामार्फत आयोजित ग्रंथालय भेट व प्रात्यक्षिक

हिंदी विभाग व ग्रंथालया मार्फत बी.ए. भाग एकच्या विद्यार्थिनींना ग्रंथालयाचा वापर करण्यासंबंधीचे मार्गदर्शन करण्यासाठी व संदर्भ साहित्याचा वापर करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी हिंदी विभाग मार्फत ग्रंथालय भेट व प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. यावेळी ग्रंथालयामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा व सुविधांची विद्यार्थिनींना माहिती देण्यात आली.

News

सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ

कमला महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य पी. एस. जाधव, डॉ. अनघा पाठक व श्री राजेंद्र इंगवले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समारंभास सौ. कांचन पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.

News

डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करताना कमला कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन

ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करताना विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय व छत्रपती शहाजी महाविद्यालय, कोल्हापूर शिवाजी ग्रंथालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मराठी विभागामार्फत अब्दुल कलाम यांच्यावरील विविध साहित्याचे भीत्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले. भीत्तीपत्रकाचे उद्घाटन मा प्रा डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.सुजय पाटील, ग्रंथपाल उर्मिला कदम, वॉलपेपर समिती प्रमुख प्राध्यापक सुमती साळुंके तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अब्दुल कलाम यांच्या वरील विविध वाचन साहित्य वाचन साहित्यावरील व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.

Scroll to Top