News

News

कमला कॉलेजमध्ये योगदिन साजरा

ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये २१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार रंगराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील, प्रा. डॉ. सुनीता काळे, प्रा. मेजर वर्षा साठे, इन्स्ट्रक्टर सोनम उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थिनींनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकामध्ये उत्साहपूर्वक सहभाग घेतला. या वेळी विविध प्रकारची आसने आणि प्राणायाम करवून घेण्यात आला. प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते, प्रा. रेखा पंडित, योग विभागाच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या वेळी दोनशेहून अधिक विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

News

कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण

पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे अध्यक्ष सुभाष कुत्ते, चरे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे, रोटरी ट्रेनर महेंद्र परमार, मोहन गरगटे, सिद्धार्थ पाटणकर, नामदेव काफडे, बाबाभाई वसा, दिलीप हळदीकर, सुभाष मालू, बाळासाहेब वडगावे या मान्यवरांनीही वृक्षारोपण केले. या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते व शिवाजी कामते यांनी केले.

Scroll to Top