Author name: Smt. Urmila Kadam

News

कमला कॉलेजमध्ये प्रथम सत्र समाप्ती मीटिंगचे आयोजन

दिनांक 15/12/2022 रोजी प्रथम सत्र समाप्ती मीटिंगचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांची विद्यापीठ सिनेट मध्ये बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रोफेसर डॉ. वर्षा मैंदर्गी यांची शिवजी विद्यापीठ अकॅडमी कौन्सिल मध्ये बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. छाया माळी यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन पुरस्कार प्राप्त झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रोफेसर डॉ. सुजय पाटील यांना सर्वोत्कृष्ट ललित निबंध लेखन साठीचा पुरस्कारासाठी सत्कार करण्यात आला. डॉ. पूजा गोटखिंडीकर पाटील यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचे ग्रंथरूपामध्ये प्रकाशन व संशोधन कार्यास पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. उदय आठवले यांनी अर्थशास्त्र विषयांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. क्रांतीकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर होत्या. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्टाफ वेल्फेअर कमिटी मार्फत करण्यात आले.

News

ग्रंथालय विभागामार्फत बौद्धिक संपदा अधिकार जतन व ग्रंथालयांची भूमिका या विषयावरील लीड कॉलेज कार्यशाळा संपन्न

दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी कमला कॉलेज ग्रंथालय विभागामार्फत बौद्धिक संपदा अधिकार जतन व ग्रंथालयांची भूमिका या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, अध्यक्ष ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे डॉ. सचिन पाटील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व लीड कॉलेज क्लस्टर समन्वयक प्राध्यापक तानाजी कांबळे ग्रंथपाल डी आर के कॉमर्स कॉलेज हे होते या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातून विद्यार्थिनी ग्रंथपाल व प्राध्यापक सहभागी झाले. कार्यशाळेचे आयोजन ग्रंथपाल श्रीमती उर्मिला कदम व ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले.

News

शिवाजी विद्यापीठ आयोजित जिल्हास्तरीय पदवी स्तरावरील आविष्कार संशोधन महोत्सवात कमला काॅलेजच्या विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक

शिवाजी विद्यापीठ आयोजित जिल्हास्तरीय पदवी स्तरावरील आविष्कार संशोधन महोत्सवात Agriculture and Animal Husbandry गटात कमला काॅलेजच्या सफा बागवान व सिमिन बागवान (B.VOC Food Processing and Management ) या विद्यार्थिनींना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

News

कमला कॉलेजमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त कमला कॉलेजमध्ये प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी कमला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते

News

Dr. Tejaswini Mudekar, Principal of our College was elected unopposed as Senate Member and Dr. Varsha Maindargi, HOD Commerce dept. Was elected as Academic Council Member of Shivaji University, Kolhapur

Dr. Tejaswini Mudekar, Principal of Kamla College was elected unopposed as Senate Member of Shivaji University and Dr. Varsha Mindargi HOD Commerce Department was elected as Academic Council Member of Shivaji University unopposed. Dr. Krantikumar Patil, Executive President of Tararani University, congratulated him with a bouquet of flowers for this achievement. All the teachers and non-teaching staff of the college were present on the occasion. The felicitation program was organized by the Staff Academy Committee.

News

Birth Anniversary of Sardar Vallabhbhai Patel and Death Anniversary of Indira Gandhi Celebrated in Kamala College

The birth anniversary of India’s first Home Minister Sardar Vallabhbhai Patel and the death anniversary of India’s first Prime Minister Mrs. Indira Gandhi were celebrated at Kamala College. On this occasion, NSS department administered oath to the students and worshiped the images of Sardar Vallabhbhai Patel and Mrs. Indira Gandhi by the Executive President of Tararani Vidyapeeth,Dr. Krantikumar Patil. On this occasion Dr. Tejaswini Mudekar, Principal of Kamala College, all fellow professors, non-teaching staff were present.

News

कमला कॉलेजमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांच्या जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त कमला महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व कमला कॉलेज मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे व विश्वकोशावरील भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले. याबरोबरच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्याद्वारे आयोजित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. मराठी विश्वकोशावरील या प्रश्नमंजुषेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व सूची खंड देण्यात आला. क्रांतिवीर रंगराव दादा पाटील ग्रंथालय मार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन व कार्य” या भितीपत्रकाचे आयोजन करण्यात आले याबरोबरच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावरील प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थिनीमधून प्रथम , द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले. कमला कॉलेजच्या जुनियर विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त सायन्स विभागाद्वारे प्रश्नमंजुषा व मराठी विभागामार्फत मराठी वाचन स्पर्धा घेण्यात आली. सर्व उपक्रमांसाठी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील सराचे मार्गदर्शन लाभले तसेच कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रत्यक्ष सहभाग आम्हा सर्वांचे नेहमीच मनोबल वाढवत असते. वरील सर्व उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.

Scroll to Top