News

News

On the 29th Death Observance Ceremony of Dr. V.T.Patil tatha Kakaji, Founder President of Tararani Vidyapeeth Celebrated an Announced Adarsh Shikshak Puraskar at Tararani Vidyapeeths’ V.T.Patil Smrutibhavan on 17th Jan 2024

On the occasion of 29th death anniversary of Dr. V.T. Patil tatha Kakaji lecture organized on the Contribution of Dr.V.T.Patil tatha Kakaji due respect with Womens Education. On this occasion Registrar of Shivaji University Dr. V. N. Shinde was present as the keynote speaker. On this ocasion shri Sagar Watkar Assistant Teacher at Usharaje Highschool was felicitated with Adarsh Shishak Puraskar with the hands of dr.V.N.Shinde, for his  extra ordinary work the the education field. Dr. V.N.Shinde has been delivered lecture on the contribution of Kakaji in womens’ education. For this ceremony Dr. Krantikumar Patil, Executive President of Tararani Vidyapeeth, Secretary of Tararani Vidyapeeth, Hon’ble Prajakt Patil, principal of kamala College, Heads of all branches, fellow faculty members of all branches and students were present in large numbers in the presided over the program.

News

कमला कॉलेजचे जिल्हास्तरीय मराठी वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धेत यश

भारतीय शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय मराठी वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये कमला कॉलेजची विद्यार्थिनी 1) कुमारी राजलक्ष्मी रणजीत कदम बीए भाग 3 या विद्यार्थिनीने मराठी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह रोख रुपये1500/- lपुरस्काराची ती मानकरी ठरली.तसेच तिने निबंध लेखन स्पर्धेत देखील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले व प्रमाणपत्र रोख रुपये 500/- पुरस्काराची मानकरी ठरली. 2)कुमारी समीना मुबारक शेख बीए 2 या वर्गातील विद्यार्थिनीने मराठी निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह आणि रोख1500/- रुपयांची मानकरी ठरली. यशस्वी विद्यार्थिनींना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर क्रांतिकार पाटील साहेब सचिव माननीय प्राजक्त पाटील साहेब प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे प्रोत्साहन लाभले तर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

News

Krantijoti Savitribai Phule Birth Anniversary Celebrated at Kamala College, Kolhapur on 3rd January 2024

On the occasion of Savitribai Phule’s birth anniversary, the statue of Savitribai was worshiped in Kamla College. On this occasion, flowers were offered to the statue by the executive president of Tararani Vidyapeeth,s Dr. Krantikumar Patil, and the statue was worshiped by Dr. Tejaswini Mudekar, principal of Kamla College. All teaching and non teaching staff were present for this program.

News

क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन दिनांक 23 डिसेंबर 2023

ताराराणी विद्यापीठाचे माजी उपाध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे 6 वे पुष्प पद्मश्री डॉ. कुमार केतकर यांनी गुंफले. या प्रसंगी त्यांनी देशाची सध्य: स्थिती आणि भविष्य या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ क्रंतिकुमार पाटील होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष एस. एन.पवार, हीलगे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाखाप्रमुख, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

News

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कमला महाविद्यालयामध्ये विनम्र अभिवादन

ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार अर्पण करून ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, सर्व सहकारी प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

News

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे उज्वल यश

क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य व कृषी संचालनालय महाराष्ट्र राज्य आयोजित स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे उज्वल यश वक्तृत्व स्पर्धा – द्वितीय क्रमांक- कुमारी राजलक्ष्मी रणजीत कदम कथा लेखन स्पर्धा – तृतीय क्रमांक- राजलक्ष्मी रणजीत कदम पाककला स्पर्धा – तृतीय क्रमांक-दर्शनी निनाद पोवार सोलो स्पर्धा -द्वितीय क्रमांक- दर्शनी निनाद पोवार यशस्वी विद्यार्थिनींना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील साहेब, सचिव प्राजक्त पाटील साहेब ,प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच प्रोत्साहन लाभले.

News

आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे यश

सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे दि.27/10/2023 रोजी झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर्गत *आंतरविभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये कमला कॉलेज कोल्हापूर मधील खेळाडू कु. मयुरी मुकुंद सावळकर (B.C.A.III) हिने प्रथम क्रमांक मिळविला* आहे. *H.N.S.C. युनिव्हर्सिटी,मुंबई येथे होणाऱ्या वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी चेस कॉम्पिटिशन साठी शिवाजी विद्यापीठ बुद्धिबळ संघामध्ये निवड.

News

डॉ. जे.जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज जयसिंगपूर येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये यश

डॉ. जे.जे.मगदूम इंजिनिअरिंग कॉलेज जयसिंगपूर येथे झालेल्या कोल्हापूर विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये आपल्या *कॉलेजच्या विद्यार्थिनींनी आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवत सेकंड जनरल चॅम्पियनशिप मिळविली* आहे. तसेच *कु. मयुरी सावळकर (B.C.A.III) या खेळाडूने प्रथम क्रमांक पटकाविला आहे* . दिनांक 27 ऑक्टोबर 2023 रोजी सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा येथे होणाऱ्या *शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय ♟️बुद्धिबळ ♟️स्पर्धेमध्ये कु.मयुरी सावळकर तिची निवड झाली आहे* . *महाविद्यालयाच्या वतीने कॉलेजच्या♟️ बुद्धिबळ♟️ संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व कु. मयुरी सावरकर हिच्या पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा*

News

मनपा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे यश

शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक येथे झालेल्या मनपा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धे मधील दुसऱ्या दिवशी देखील कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2023 दिवशी झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये *1 सुवर्णपदक???? आणि 2 रोप्य पदक???? अशी एकूण तीन पदके व 1 चतुर्थ क्रमांक* मिळविला आहे. बारावी मधील *कु. शितल तानाजी कुंभार या खेळाडूने 1500 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक* मिळविला आहे. बारावी मधील *कु.शुभांगी संदीप कुंभार या खेळाडूने 200 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक* मिळविला आहे. 4×400 रिले मध्ये *कमला कॉलेजच्या संघाने द्वितीय क्रमांक* मिळविला आहे. कॉलेजच्या *रिले संघामध्ये कु.वैष्णवी कुंडलिक यादव, कु. खतीजा बिलाल नदाफ, कु. ईश्वरी आनंदा पुजारी, कु. सिमरन रामचंद्र लोंढे* या खेळाडूंचा समावेश होता. तसेच अकरावी मधील *कु. गायत्री शशिकांत पाडळकर या खेळाडूने 200 मीटर धावणे मध्ये चतुर्थ क्रमांक* मिळविला.

News

कमला कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

कमला कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिना निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय मार्फत दोन दिवसाचे ग्रंथ प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन व शिवाजी महाराजांनच्या चरित्र ग्रंथाचे वाचन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.मराठी विभागामार्फत वाचन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्व उपक्रम आयोजित करताना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील साहेब याचे मार्गदर्शन लाभले तसेच कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे  मार्गदर्शन व सहकार्य लाभले

News

कोल्हापूर मनपा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये कमला कॉलेजचे यश

कोल्हापूर मनपा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कमला कॉलेजने घवघवीत यश संपादन केले.आजच्या दिवसभरामध्ये एकूण चार सुवर्णपदक, तीन रोप्य पदक आणि चार कास्यपदक अशी एकूण अकरा पदकांची कमाई केली आहे. यामध्ये अकरावी मधील खेळाडू कु. दिव्या दिपक कोळी या खेळाडूने लांब उडी मध्ये प्रथम, 100 मीटर हार्डल्स मध्ये प्रथम व 100 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून एकूण तीन पदके मिळवली आहेत. अकरावी मधील खेळाडू कु.वैष्णवी कुंडलिक यादव या खेळाडूने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक तसेच थाळी फेक मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. बारावी मधील खेळाडू कु.सिमरन रामचंद्र लोंढे या खेळाडूने 800 मीटर मध्ये द्वितीय तर 400 मीटर मध्ये तृतीय क्रमांक मिळविला. बारावी मधील खेळाडू कु. शितल तानाजी कुंभार या खेळाडूने 3000 मीटर धावणे (3 Km धावणे) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. अकरावी मधील खेळाडू कु. वैष्णवी ज्ञानेश्वर नन्नवरे गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. अकरावी मधील खेळाडू कु.खतीजा बिलाल नदाफ हिने 800 मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच मैदानी क्रीडा प्रकारातील सांघिक खेळ प्रकार *4×100 रिले मध्ये सलग दुसऱ्यांदा आपल्या कॉलेजने प्रथम क्रमांक मिळविला आहे. रिले संघामध्ये कु. दिव्या दीपक कोळी, कु शुभांगी संदीप कुंभार, कु.स्नेहल संजय राणे, कु. शितल तानाजी कुंभार व कु. सानिका सुनील कांबळे या खेळाडूंचा समावेश होता. सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या एकूण सात खेळाडूंची निवड झाली आहे.या खेळाडूंनी आज झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.

News

शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेमध्ये कमला कॉलेज क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक पटकावला

शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर विभागीय क्रीडा परिषद 2023-24 क्रिकेट महिला स्पर्धेमध्ये ०६ संघ सहभागी होते.यामध्ये कमला कॉलेज,कोल्हापूरच्या क्रिकेट संघाने तृतीय क्रमांक मिळविला. दि. ४ ते ६ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धासाठी कमला कॉलेज कोल्हापूर चा संघ पात्र झाल. पात्र संघाचे हार्दिक अभिनंदन. यशस्वी खेळाडूंना सर्वांनी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे प्रोत्साहन लाभले. क्रीडा शिक्षक ज्योती गावडे व इतर सर्व सहकारी प्राध्यापक बंधू भगिनीं यांचेही सर्व खेळाडूंना सहकार्य व मार्गदर्शन लाभले

Scroll to Top