

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त कमला कॉलेजमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चित्रकला स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, ज्येष्ठ नागरिक सत्कार व व्याख्यान, सकस आहार, भित्तिपत्रक, निबंध स्पर्धा, मोबाईलचे दुष्परिणाम विषयावरील व्याख्यान, प्लास्टिक मुक्त गाव, प्रश्नमंजुषा यासारख्या विविध स्पर्धांचे व उपक्रमांचे आयोजन सिनियर, ज्युनिअर, एनसीसी,एनएसएस विभागांमार्फत करण्यात आले.दिनांक 13 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये ताराराणी विद्यापीठाचे सचिव माननीय प्राजक्त पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 14 ऑगस्ट रोजी पर्वते पाटील साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विविध शाखाप्रमुख, सर्व शाखांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. विविध उपक्रम आयोजित करताना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ.क्रांतिकुमार पाटील यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन नेहमीच लाभते. या उपक्रमाचे आयोजन करताना महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर, उपप्राचार्य एम. एन. जाधव, सीनियर व ज्युनिअर विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
