स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कमला कॉलेजमध्ये ध्वजारोहण.
ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये स्वतंत्रता दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठांमधील विविध शाखाचे प्रमुख सर्व शाखांमधील सेवक वर्ग तसेच विद्यार्थिनी, पालक ध्वजारोहण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक जाणिव असलेली सुजान नागरिक घडविण्याची प्रतिज्ञा शिक्षकांना देण्यात आली.