
शिवाजी विद्यापीठ सिंथेटिक ट्रॅक येथे झालेल्या मनपा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धे मधील दुसऱ्या दिवशी देखील कमला कॉलेजच्या विद्यार्थिनींनी यश संपादन केले. मंगळवार दि. 17 ऑक्टोबर 2023 दिवशी झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये *1 सुवर्णपदक???? आणि 2 रोप्य पदक???? अशी एकूण तीन पदके व 1 चतुर्थ क्रमांक* मिळविला आहे. बारावी मधील *कु. शितल तानाजी कुंभार या खेळाडूने 1500 मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक* मिळविला आहे. बारावी मधील *कु.शुभांगी संदीप कुंभार या खेळाडूने 200 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक* मिळविला आहे. 4×400 रिले मध्ये *कमला कॉलेजच्या संघाने द्वितीय क्रमांक* मिळविला आहे. कॉलेजच्या *रिले संघामध्ये कु.वैष्णवी कुंडलिक यादव, कु. खतीजा बिलाल नदाफ, कु. ईश्वरी आनंदा पुजारी, कु. सिमरन रामचंद्र लोंढे* या खेळाडूंचा समावेश होता. तसेच अकरावी मधील *कु. गायत्री शशिकांत पाडळकर या खेळाडूने 200 मीटर धावणे मध्ये चतुर्थ क्रमांक* मिळविला.
