
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाविद्यालयाच्या ज्युनिअर विभागामार्फत भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले. या भितीपत्रकाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे विश्वस्त, कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर तेजस्विनी मुडेकर सीनियर व ज्युनिअर विभागातील प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.