
कमला महाविद्यालयामध्ये उपप्राचार्य पी. एस. जाधव, डॉ. अनघा पाठक व श्री राजेंद्र इंगवले यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतीकुमार पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. समारंभास सौ. कांचन पाटील, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर, सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर बंधू-भगिनी उपस्थित होते.