
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४३वी जयंती ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जे. श्री. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एन. एस. शिरोळकर यांनी केले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.