
ताराराणी विद्यापीठाच्या अध्यापक विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालयास क्षेत्रभेट केली याप्रसंगी ग्रंथपाल उर्मिला कदम यांनी विद्यार्थिनींना ग्रंथालयाविषयी व राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांविषयी माहिती करून दिली. यावेळी अध्यापक महाविद्यालयातील प्राध्यापक श्री अवतार सर व श्री जगताप सर उपस्थित होते कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे या प्रसंगी मार्गदर्शन मिळाले.