


ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करताना विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय व छत्रपती शहाजी महाविद्यालय, कोल्हापूर शिवाजी ग्रंथालय यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. मराठी विभागामार्फत अब्दुल कलाम यांच्यावरील विविध साहित्याचे भीत्तीपत्रकाचे आयोजन करण्यात आले. भीत्तीपत्रकाचे उद्घाटन मा प्रा डॉ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ.सुजय पाटील, ग्रंथपाल उर्मिला कदम, वॉलपेपर समिती प्रमुख प्राध्यापक सुमती साळुंके तसेच विद्यार्थिनी उपस्थित होत्या. ग्रंथालय विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त अब्दुल कलाम यांच्या वरील विविध वाचन साहित्य वाचन साहित्यावरील व्हिडीओ मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली.