दिनांक 3 डिसेंबर 2022 रोजी कमला कॉलेज ग्रंथालय विभागामार्फत बौद्धिक संपदा अधिकार जतन व ग्रंथालयांची भूमिका या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, अध्यक्ष ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर होते. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. प्रमुख पाहुणे डॉ. सचिन पाटील ग्रंथालय आणि माहितीशास्त्र विभाग प्रमुख शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व लीड कॉलेज क्लस्टर समन्वयक प्राध्यापक तानाजी कांबळे ग्रंथपाल डी आर के कॉमर्स कॉलेज हे होते या कार्यशाळेसाठी विविध महाविद्यालयातून विद्यार्थिनी ग्रंथपाल व प्राध्यापक सहभागी झाले. कार्यशाळेचे आयोजन ग्रंथपाल श्रीमती उर्मिला कदम व ग्रंथालय विभागामार्फत करण्यात आले.