

ताराराणी विद्यापीठाचे माजी उपाध्यक्ष, थोर स्वातंत्र्य सेनानी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या 104 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमालेचे 6 वे पुष्प पद्मश्री डॉ. कुमार केतकर यांनी गुंफले. या प्रसंगी त्यांनी देशाची सध्य: स्थिती आणि भविष्य या विषयावर आपले विचार मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉ क्रंतिकुमार पाटील होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव प्राजक्त पाटील, उपाध्यक्ष एस. एन.पवार, हीलगे साहेब, संस्थेचे सर्व पदाधिकारी, सर्व शाखाप्रमुख, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.