पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले.
या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे अध्यक्ष सुभाष कुत्ते, चरे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे, रोटरी ट्रेनर महेंद्र परमार, मोहन गरगटे, सिद्धार्थ पाटणकर, नामदेव काफडे, बाबाभाई वसा, दिलीप हळदीकर, सुभाष मालू, बाळासाहेब वडगावे या मान्यवरांनीही वृक्षारोपण केले. या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते व शिवाजी कामते यांनी केले.