कमला महाविद्यालयात नवीन विद्यार्थिनींसाठी स्वागत कार्यक्रम

savaagata-kaarayakaramaविद्यार्थिनींनी ताराराणी विद्यापीठाचा वारसा समजून घेऊन, तो जतन करावा,’ असे आवाहन विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.विद्यार्थिनींनी ताराराणी विद्यापीठाचा वारसा समजून घेऊन, तो जतन करावा,’ असे आवाहन विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.
‘ताराराणी विद्यापीठाची स्थापना १९४५मध्ये करण्यात आली. प्रारंभी बावीस मुलींसह सुरू झालेल्या या संस्थेत आज पाच हजारांहून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. पूर्व प्राथमिकपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण देण्याची सोय विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आहे,’ असे पाटील म्हणाले. ‘कमला महाविद्यालय १९८३मध्ये सुरू झाले. त्या वेळी संस्थेला आपली सारी स्थावर मालमत्ता देणाऱ्या के. डी. टी. पाटील (काकाजी) यांच्या पत्नी कमला यांचे नाव महाविद्यालयाला देण्यात आले,’ अशी माहिती त्यांनी दिली.
या वेळी डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील फूड प्रोसेसिंग विभागाच्या फेसबुक पेजचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील आणि प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी उद्बोधन केले. प्रा. डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. एन. एस. शिरोळकर व प्रा. अनिल घस्ते यांचे सहकार्य लाभले.
कमला महाविद्यालयात कनिष्ठ विभागात कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचे शिक्षण दिले जाते. वरिष्ठ विभागात कला, वाणिज्य तसेच बीसीए, बी. व्होक. रिटेल मॅनेजमेंट व बी. व्होक. फूड प्रोसेसिंग या पदव्यांचे शिक्षण दिले जाते. महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थिनी नोकरी व स्वयंरोजगारामध्ये यशस्वी झाल्या आहेत. तसेच प्रशासकीय सेवेतदेखील अनेक विद्यार्थिनी कार्यरत आहेत. क्रीडा, साहित्य व कला या क्षेत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गौरवपूर्ण कामगिरी बजावली आहे

Scroll to Top