


कमला कॉलेजमध्ये वाचन प्रेरणा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत शासनाकडून आयोजित करण्यात आलेल्या वाचन प्रेरणा दिना निमित्त व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
क्रांतिवीर रंगरावदादा पाटील ग्रंथालय मार्फत दोन दिवसाचे ग्रंथ प्रदर्शन, पोस्टर प्रेझेंटेशन व शिवाजी महाराजांनच्या चरित्र ग्रंथाचे वाचन या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मराठी विभागामार्फत वाचन कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सर्व उपक्रम आयोजित करताना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील साहेब याचे मार्गदर्शन लाभले तसेच कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले