दिनाक २६ जून रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ क्रांतिकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रम पार पडला. याप्रसंगी कमला कॉलेजच्या प्राचार्या डाँ. तेजस्विनी मुडेकर यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. . .