
ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये २१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार रंगराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील, प्रा. डॉ. सुनीता काळे, प्रा. मेजर वर्षा साठे, इन्स्ट्रक्टर सोनम उपस्थित होत्या.
या वेळी विद्यार्थिनींनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकामध्ये उत्साहपूर्वक सहभाग घेतला. या वेळी विविध प्रकारची आसने आणि प्राणायाम करवून घेण्यात आला.
प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते, प्रा. रेखा पंडित, योग विभागाच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या वेळी दोनशेहून अधिक विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.