
दिनांक 15/12/2022 रोजी प्रथम सत्र समाप्ती मीटिंगचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांची विद्यापीठ सिनेट मध्ये बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रोफेसर डॉ. वर्षा मैंदर्गी यांची शिवजी विद्यापीठ अकॅडमी कौन्सिल मध्ये बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. छाया माळी यांना राष्ट्रीय स्तरावरील संशोधन पुरस्कार प्राप्त झाले बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रोफेसर डॉ. सुजय पाटील यांना सर्वोत्कृष्ट ललित निबंध लेखन साठीचा पुरस्कारासाठी सत्कार करण्यात आला. डॉ. पूजा गोटखिंडीकर पाटील यांच्या पीएचडीच्या प्रबंधाचे ग्रंथरूपामध्ये प्रकाशन व संशोधन कार्यास पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. डॉ. उदय आठवले यांनी अर्थशास्त्र विषयांमध्ये पीएचडी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. क्रांतीकुमार पाटील, कार्यकारी अध्यक्ष ताराराणी विद्यापीठ कोल्हापूर व कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर होत्या. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन स्टाफ वेल्फेअर कमिटी मार्फत करण्यात आले.