डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त कमला महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व कमला कॉलेज मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे व विश्वकोशावरील भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले. याबरोबरच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्याद्वारे आयोजित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. मराठी विश्वकोशावरील या प्रश्नमंजुषेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थिनींना प्रमाणपत्र व सूची खंड देण्यात आला. क्रांतिवीर रंगराव दादा पाटील ग्रंथालय मार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त “डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन व कार्य” या भितीपत्रकाचे आयोजन करण्यात आले याबरोबरच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावरील प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थिनीमधून प्रथम , द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले. कमला कॉलेजच्या जुनियर विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त सायन्स विभागाद्वारे प्रश्नमंजुषा व मराठी विभागामार्फत मराठी वाचन स्पर्धा घेण्यात आली. सर्व उपक्रमांसाठी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील सराचे मार्गदर्शन लाभले तसेच कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रत्यक्ष सहभाग आम्हा सर्वांचे नेहमीच मनोबल वाढवत असते. वरील सर्व उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.