भारतीय शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर शहर व जिल्हा यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय मराठी वक्तृत्व आणि निबंध लेखन स्पर्धा आयोजित केली होती त्यामध्ये कमला कॉलेजची विद्यार्थिनी
1) कुमारी राजलक्ष्मी रणजीत कदम बीए भाग 3 या विद्यार्थिनीने मराठी वक्तृत्व स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला आणि प्रमाणपत्र,स्मृतिचिन्ह रोख रुपये1500/- lपुरस्काराची ती मानकरी ठरली.तसेच तिने निबंध लेखन स्पर्धेत देखील उत्तेजनार्थ पारितोषिक मिळवले व प्रमाणपत्र रोख रुपये 500/- पुरस्काराची मानकरी ठरली.
2)कुमारी समीना मुबारक शेख बीए 2 या वर्गातील विद्यार्थिनीने मराठी निबंध लेखन स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त केला व प्रमाणपत्र स्मृतीचिन्ह आणि रोख1500/- रुपयांची मानकरी ठरली.
यशस्वी विद्यार्थिनींना ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर क्रांतिकार पाटील साहेब सचिव माननीय प्राजक्त पाटील साहेब प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचे प्रोत्साहन लाभले तर मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सुजय पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.