Author name: Dr. Smt. Anagha Pathak

News

Clean Campus Oath on 12 August 2017

Clean campus oath is taken by the students of kamala college on 12 August 2017 at 7.45 A.M. Dr.S.B.Patil and Shri. N.S.Shirolkar have given the oath to the the students and faculty for maintaining clean campus of kamala college. Hon.Principal and all senior faculty members were also present .

News

कमला महाविद्यालयात नवीन विद्यार्थिनींसाठी स्वागत कार्यक्रम

विद्यार्थिनींनी ताराराणी विद्यापीठाचा वारसा समजून घेऊन, तो जतन करावा,’ असे आवाहन विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते.विद्यार्थिनींनी ताराराणी विद्यापीठाचा वारसा समजून घेऊन, तो जतन करावा,’ असे आवाहन विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये नवागत विद्यार्थिनींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘ताराराणी विद्यापीठाची स्थापना १९४५मध्ये करण्यात आली. प्रारंभी बावीस मुलींसह सुरू झालेल्या या संस्थेत आज पाच हजारांहून अधिक मुली शिक्षण घेत आहेत. पूर्व प्राथमिकपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत शिक्षण देण्याची सोय विद्यापीठाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आहे,’ असे पाटील म्हणाले. ‘कमला महाविद्यालय १९८३मध्ये सुरू झाले. त्या वेळी संस्थेला आपली सारी स्थावर मालमत्ता देणाऱ्या के. डी. टी. पाटील (काकाजी) यांच्या पत्नी कमला यांचे नाव महाविद्यालयाला देण्यात आले,’ अशी माहिती त्यांनी दिली. या वेळी डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या हस्ते व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेतील फूड प्रोसेसिंग विभागाच्या फेसबुक पेजचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील आणि प्रा. डॉ. वर्षा मैंदर्गी यांनी उद्बोधन केले. प्रा. डॉ. तेजस्विनी मुडेकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला प्रा. एन. एस. शिरोळकर व प्रा. अनिल घस्ते यांचे सहकार्य लाभले. कमला महाविद्यालयात कनिष्ठ विभागात कला, वाणिज्य व विज्ञान शाखांचे शिक्षण दिले जाते. वरिष्ठ विभागात कला, वाणिज्य तसेच बीसीए, बी. व्होक. रिटेल मॅनेजमेंट व बी. व्होक. फूड प्रोसेसिंग या पदव्यांचे शिक्षण दिले जाते. महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थिनी नोकरी व स्वयंरोजगारामध्ये यशस्वी झाल्या आहेत. तसेच प्रशासकीय सेवेतदेखील अनेक विद्यार्थिनी कार्यरत आहेत. क्रीडा, साहित्य व कला या क्षेत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी गौरवपूर्ण कामगिरी बजावली आहे

News

कमला कॉलेजमध्ये योगदिन साजरा

ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयामध्ये २१ जून रोजी जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. या दिनाचे उद्घाटन ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार रंगराव पाटील यांच्या हस्ते झाले. या वेळी प्राचार्य डॉ. जे.बी. पाटील, प्रा. डॉ. सुनीता काळे, प्रा. मेजर वर्षा साठे, इन्स्ट्रक्टर सोनम उपस्थित होत्या. या वेळी विद्यार्थिनींनी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी योगासनांच्या प्रात्यक्षिकामध्ये उत्साहपूर्वक सहभाग घेतला. या वेळी विविध प्रकारची आसने आणि प्राणायाम करवून घेण्यात आला. प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते, प्रा. रेखा पंडित, योग विभागाच्या विद्यार्थिनींनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते. या वेळी दोनशेहून अधिक विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

News

कमला महाविद्यालयामध्ये वृक्षारोपण

पन्नास कोटी वृक्ष लागवडीच्या अंमलबजावणी कार्यक्रमाचा भाग म्हणून ‘रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर’च्या सहकार्याने येथील कमला महाविद्यालयातील विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी वृक्षारोपण केले. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील, रोटरीचे अध्यक्ष सुभाष कुत्ते, चरे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे, रोटरी ट्रेनर महेंद्र परमार, मोहन गरगटे, सिद्धार्थ पाटणकर, नामदेव काफडे, बाबाभाई वसा, दिलीप हळदीकर, सुभाष मालू, बाळासाहेब वडगावे या मान्यवरांनीही वृक्षारोपण केले. या वेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. जे.बी.पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते व शिवाजी कामते यांनी केले.

Scroll to Top