Author name: Dr. Smt. Anagha Pathak

News

कमला महाविद्यालयात क्रांतिकारक रंगरावदादा पाटील यांची पुण्यतिथी साजरी

ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयाचे आधारस्तंभ राहिलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील पुरोगामी विचारवंत क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांची ११वी पुण्यतिथी कमला महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल उर्मिला कदम यांनी केले. या वेळी कमला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील उपस्थित होते. तसेच प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते, प्रा. अनघा पाठक, प्रा. सुजय पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

News

शाहू महाराजांची जयंती कमला कॉलेजमध्ये साजरी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १४३वी जयंती ताराराणी विद्यापीठाच्या कमला कॉलेजमध्ये साजरी करण्यात आली. या वेळी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जे. श्री. पाटील यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. एन. एस. शिरोळकर यांनी केले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते.

Scroll to Top