Posted on
October 19 2023
By
Smt Urmila Kadam

कोल्हापूर मनपा जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कमला कॉलेजने घवघवीत यश संपादन केले.आजच्या दिवसभरामध्ये एकूण चार सुवर्णपदक, तीन रोप्य पदक आणि चार कास्यपदक अशी एकूण अकरा पदकांची कमाई केली आहे.
यामध्ये अकरावी मधील खेळाडू कु. दिव्या दिपक कोळी या खेळाडूने लांब उडी मध्ये प्रथम, 100 मीटर हार्डल्स मध्ये प्रथम व 100 मीटर धावणे मध्ये द्वितीय क्रमांक मिळवून एकूण तीन पदके मिळवली आहेत.
अकरावी मधील खेळाडू कु.वैष्णवी कुंडलिक यादव या खेळाडूने लांब उडीमध्ये द्वितीय क्रमांक तसेच थाळी फेक मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.
बारावी मधील खेळाडू कु.सिमरन रामचंद्र लोंढे या खेळाडूने 800 मीटर मध्ये द्वितीय तर 400 मीटर मध्ये तृतीय क्रमांक मिळविला.
बारावी मधील खेळाडू कु. शितल तानाजी कुंभार या खेळाडूने 3000 मीटर धावणे (3 Km धावणे) स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.
अकरावी मधील खेळाडू कु. वैष्णवी ज्ञानेश्वर नन्नवरे गोळा फेक मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.
अकरावी मधील खेळाडू कु.खतीजा बिलाल नदाफ हिने 800 मीटर धावणे मध्ये तृतीय क्रमांक मिळविला आहे.
तसेच मैदानी क्रीडा प्रकारातील सांघिक खेळ प्रकार *4×100 रिले मध्ये सलग दुसऱ्यांदा आपल्या कॉलेजने प्रथम क्रमांक मिळविला आहे. रिले संघामध्ये कु. दिव्या दीपक कोळी, कु शुभांगी संदीप कुंभार, कु.स्नेहल संजय राणे, कु. शितल तानाजी कुंभार व कु. सानिका सुनील कांबळे या खेळाडूंचा समावेश होता.
सांगली येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय मैदानी स्पर्धेमध्ये आपल्या महाविद्यालयाच्या एकूण सात खेळाडूंची निवड झाली आहे.या खेळाडूंनी आज झालेल्या मैदानी स्पर्धेमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.