कमला कॉलेजमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांच्या जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले

Posted on
October 15 2022
By
Smt Urmila Kadam
कमला कॉलेजमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांचा जन्मदिन  "मराठी भाषा दिनानिमित्त" विविध उपक्रमांचे आयोजन
कमला कॉलेजमध्ये डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांचा जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिन व मराठी भाषा दिनानिमित्त कमला महाविद्यालयामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ व कमला कॉलेज मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्याख्यानाचे व विश्वकोशावरील भित्तिपत्रकाचे आयोजन करण्यात आले. याबरोबरच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांच्याद्वारे आयोजित प्रश्नमंजुषा घेण्यात आली. मराठी विश्वकोशावरील या प्रश्नमंजुषेमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ विद्यार्थिनींना  प्रमाणपत्र व सूची खंड देण्यात आला. क्रांतिवीर रंगराव दादा पाटील ग्रंथालय मार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जीवन व कार्य" या भितीपत्रकाचे आयोजन करण्यात आले याबरोबरच डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्यावरील प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली. यामध्ये सहभागी विद्यार्थिनीमधून प्रथम , द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे नंबर काढण्यात आले. कमला कॉलेजच्या जुनियर विभागामार्फत वाचन प्रेरणा दिनानिमित्त सायन्स विभागाद्वारे प्रश्नमंजुषा व मराठी विभागामार्फत मराठी वाचन स्पर्धा घेण्यात आली. सर्व उपक्रमांसाठी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील  सराचे मार्गदर्शन लाभले तसेच कमला कॉलेजच्या प्राचार्य डॉ. तेजस्विनी मुडेकर यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व प्रत्यक्ष सहभाग आम्हा सर्वांचे नेहमीच मनोबल वाढवत असते. वरील सर्व उपक्रमामध्ये सर्व विद्यार्थिनी व प्राध्यापकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.