कमला महाविद्यालयात क्रांतिकारक रंगरावदादा पाटील यांची पुण्यतिथी साजरी

Posted on
August 28 2017
By
Dr. Pathak Anagha
कमला महाविद्यालयात क्रांतिकारक रंगरावदादा पाटील यांची पुण्यतिथी साजरी

ताराराणी विद्यापीठाच्या कमला महाविद्यालयाचे आधारस्तंभ राहिलेले, भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर सेनानी राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील पुरोगामी विचारवंत क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांची ११वी पुण्यतिथी कमला महाविद्यालयामध्ये साजरी करण्यात आली. 

याप्रसंगी ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी क्रांतिवीर रंगरावदादा पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल उर्मिला कदम यांनी केले. या वेळी कमला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. पाटील उपस्थित होते. तसेच प्रा. एन. एस. शिरोळकर, प्रा. अनिल घस्ते, प्रा. अनघा पाठक, प्रा. सुजय पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.